बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईची झळ; सीएनजीपाठोपाठ आरे दूधही ‘इतक्या’ रुपयांनी महागले

मुंबई | कोरोना (Corona) महामारीमुळे सगळ्यांचंच जनजीवन विस्कळीत झालं आहे. सर्वसामान्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. याकाळात महागाईनं तर कहरचं केला आहे. एकापाठोपाठ प्रत्येक गोष्टींचे दर वाढतच चालले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोना काळात महागाईनं सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. या काळात महागाईनं तर नवा उच्चांक गाठला.सोनं-चांदी महागली. पेट्रोल-डिझेलचे दरही गगनाला भिडले. या महागाईमध्ये गृहीणींचं बजेटही कोलमडून गेलं. त्यामुळे भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठीही महागाईला तोंड द्याव लागत आहे. यानंतर सीएनजीमध्येही वाढ झाली. आता सीएनजीपाठोपाठ दूधही (Milk) महागलं.

1 डिेसेंबरपासून आरे दूधाच्या दरात वाढ करणार असल्याचा निर्णय, शासकीय प्रशासनानं घेतला आहे. सुधारित दराप्रमाणे सरसकट लिटरमागे आरे दुधाच्या दरात एक रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान, आरेच्या दुधाच्या दरात वाढण्यात करण्यात आली असल्यानं या निर्णयाला मुंबईकरांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या धोरणांमुळे महागाई वाढतेय अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

अनिल कपूर यांची ‘या’ गंभीर आजाराशी झुंज? जर्मनीतून शेअर केला व्हिडीओ

‘…म्हणून मी अमित शहांकडे तक्रार करणार आहे’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

“पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर…”

महागाईचा भडका; सीएनजी पीएनजी दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मिळू शकतात ‘इतके’ लाख रूपये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More