बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईने आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड मोडले; महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचा एक अहवाल समोर आला होता. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत 10 कोटी लोक बेरोजगार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यात आता महागाईने सामान्य माणसांच्या गळ्याभोवती फास आवळला आहे. आता महागाईने आता पर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारवर सर्व बाजूंनी कडाडून टीका होत आहे.

गेल्या वर्षी याच महिन्यात महागाई दर नकारात्मक 3.37 टक्के म्हणजेच  (- 3.37 टक्के) होता. आता घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर मागील मे महिन्यात 12.14 टक्के इतका रेकाॅर्ड स्तरावर गेला आहे. घाऊक महागाई दरासोबतच आता किरकोळ महागाई दर 6 टक्क्यावर गेला आहे. त्यामुळे आता या महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

मागील काही महिन्यांपासून सातत्यानं होणारी इंधन दरवाढ आणि खाद्य तेलाच्या किंमती वाढल्यानं किरकोळ महागाईचा दर वाढलेला दिसून येत आहे. घाऊक निर्देशांकात इंधन दरवाढीचा वाटा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 37.61 टक्के इतका आहे. त्यामुळे आता इंधन दरवाढ कमी झाली तरच महागाई दर खाली येण्याची शक्यता आहे.

एकीकडे महागाई वाढत आहे तर, दुसरीकडे लोकांच्या हातात काम मिळत नाही, त्यामुळे आता लोकांच्या खिश्यावर मोठा ताण पडणार आहे. देशात कोरोना काळापासून आधी सरकारी नियमांमुळे उद्योगधंदे बंद पडत होते. दरडोई जीडीपी, गुंतवणूक, भांडवल निर्मिती, आयात व निर्यात या सर्व क्षेत्रात नकारात्मक वाढ नोंदवली गेल्याचं सरकारी आकड्यानुसार नमूद झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

वाह!!! आता कोरोनाला मास्कच मारणार; पुण्यातील कंपनीने बनवला ‘हा’ जबरदस्त मास्क

‘या’ कारणामुळे बंगालमध्ये आदिवासी महिलेला नग्न करून संपूर्ण गावात फिरवलं; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

अबब! फक्त एका ट्विटमुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका

कधीकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘या’ अभिनेत्याकडे सध्या घर खर्च भागवण्यासाठीही पैसे नाहीत!

मोठा निर्णय! एसईबीसी प्रवर्गातील जागा आता खुल्या प्रवर्गातून भरणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More