बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईचा भडका: सीएनजी पीएनजी दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या नवे दर

मुंबई | कोरोना काळात लोकांना अनेक संकटांना सामोरे जावं लागलं. या काळात महागाईनं (Inflation) तर उच्चांक गाठलेला पहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता दुसरीकेड सीएनजी (CNG) गॅसच्या दरात देखील वाढ झाल्याचं चित्र आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसही (Domestic Pipeline Gas) महागला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या महागाईचा सामना करावा लागणार असल्याचं दिसतंय. या वाढवलेल्या दरात कराचाही समावेश आहे.

दरवाढीमुळे सीएनजी गॅस दोन रूपयांनी तर घरगुती पाइपलाईन गॅस दीड रुपयांनी महाग झाला आहे. सीएनजीचे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. या नवीन दरवाढीमुळे मुंबईत सीएनजीची किमंत प्रति किलो 63.50 रुपयांवर पोहोचली आहे. तर पीएनजीची किंमत प्रति युनिट 38 रुपये झाली आहे.

दरम्यान, नव्या दरवाढीमुळे नागरिकांना जोरदार फटका बसला आहे. मुंबईत अकरा महिन्यांमध्ये तब्बल 16 वेळेस गॅसचे दर वाढवण्यात आले आहेत. महागाईचा बडगा उडालेला असताना आता यात आणखी भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘लोकशाहीवर भाजपने धडे देण्याची गरज नाही’; अजित पवार कडाडले

धक्कादायक! स्वप्नील लोणकर पाठोपाठ आणखी एका MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मोठी बातमी! काल रात्री अचानकपणे मुख्यमंत्र्यांची विधानभवनाला भेट, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच बाहेर

‘या’ भागातील विद्यार्थ्याला कोरोनाची लागण, शाळा केली आठवड्याभरासाठी बंद

रोहित-विराटला मोठा झटका! सर्वोत्तम प्लेइंग इलेवनमध्ये स्थान नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More