बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईचा भडका; सीएनजी पीएनजी दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

मुंबई | कोरोना महामारीनंतर नागरिकांना बऱ्याच आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झालेली पहायला मिळाली. इंधन दरवाढीनं दर महागाईचा उच्चांकच गाठला आहे. अशातच आता राज्याची राजधानी मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या (CNG,PNG) किंमतीतही वाढ झाली आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना चाांगलाच फटका बसत आहे. सीएनजी पीएनजी दरात गेल्या सहा आठवड्यांमधील ही तिसरी दरवाढ आहे. मुंबईत 3 रुपये 06 पैशांची वाढ केल्यानंतर सीएनजी प्रति किलो 61.50 रुपयांना मिळेल. तर, पीएनजी गॅसची किमंत 2.26 रुपयांनी वाढवण्यात आल्यानंतर ती 36.50 रुपयांवर पोहोचली आहे.

नव्या नियमांनुसार आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे. सीएनजी आणि पीएनजीची मागणी वाढत असल्यानं महानगर गॅस (Mahanagar gas) लिमिटेडला हा निर्णय घ्यावा लागला, असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढल्यास संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

देशात सतर्कतेचं वातावरण, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर राहणार विशेष लक्ष

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला WHO नं दिलं ‘हे’ नाव, शास्त्रज्ञांकडून धोक्याची घंटा

‘कोई सहरी बाबू दिल-लहरी बाबू हाय रे’ गाण्यावर रोहित, श्रेयश आणि शार्दुलचे जोरदार ठुमके, पाहा व्हिडीओ

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंना उच्च न्यायालयाचा दणका; दिले ‘हे’ आदेश

नाना पटोले यांनी गडकरींविरोधात दाखल केलेल्या याचिकेबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More