बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! महागाईने तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली

नवी दिल्ली | देशभरात महागाई (Inflation) वाढत असल्याने सर्वसामान्य माणसाला उदरनिर्वाह करणं  कठीण होत चाललं आहे. त्यातच या तीन महिन्यातील महागाईने उच्चांक गाठला आहे. देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर सातत्याने वाढत आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (NSO) महागाई बाबत आकडेवारी जाहिर करण्यात आली आहे. तसेच ग्राहक किंमत निर्देशांनुसार किरकोळ महागाई दर काढला जातो.

नोव्हेंबर महिन्यामध्ये महागाईचा दर 4.91 टकक्यांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यातील ही वाढ सर्वात अधिक आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर 4.35 टक्के इतका होता. हा दर ऑक्टोबर महिन्यात 4.48 टक्कांवर होता. तसेच खाद्य तेलांच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढणाऱ्या महागाईचं मुख्य कारण म्हणजे कच्चे तेल, खनिज तेल, बेसिस मेटल्स, नैसर्गिक वायू, रसायने यांच्या किंमतीत झालेली वाढ आहे.

भाजीपाल्याच्या दरात कमालीचा वाढ झाल्याने नोव्हेंबर महिन्यात खाद्य महागाई वाढून 7.94 टक्क्यांवर गेला. नोव्हेंबर महिन्यातील महागाई दर 4.91 टक्यांवर असून रिझर्वं बँकेकडून (RBI) निश्चित करण्यात आलेल्या 2 ते 6 टक्क्यांच्या मर्यादेच्या आतमध्ये आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यातील घरांच्या भाववाढीचा दर 7.94 टक्के इतका आहे.

दरम्यान, कोरोनाची साथ आल्यामुळे सर्वच क्षेत्रांचं मोठ्या प्रमाणात  नुकसान झालं आहे. अनेक लोकांनी  रोजगार गमावले आहेत. त्यातच महागाई वाढत असल्याने सामान्य जनतेची होरपळ सुरू आहे. एकंदरीतच महागाईच्या दरांच्या आकडेवारीनं स्पष्ट होत आहे, सर्वसामान्य माणसांच जीवन अधिक संघर्षमय बनत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी किंमत लोकांना मोजावी लागत आहे.

थोडक्यात बातम्या-

15 विद्यार्थी Corona Positive सापडल्यानं खळबळ, विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय

Share Market: लाखाचे केले 5 कोटी!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

राहुल गांधींच्या सभेवरून आघाडीत रंगलाय कलगीतुरा?, पण भाई जगताप म्हणतात…

जॉन अब्राहमने उचललं धक्कादायक पाऊल?, चाहतेही झालेत हैराण

तुम्ही संभाजीनगर म्हणा, तुम्हाला न्यायालयात उभा करतो – गुणरत्न सदावर्ते

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More