Top News देश

नवीन कोरोना किती धोकादायक आहे?; AIIMSचे संचालक म्हणतात…

नवी दिल्ली | कोरोना संसर्ग रोगाशी तोंड देत आता कुठं संपूर्ण जग स्थिर होण्याच्या मार्गावर होतं. मात्र नुकतच ब्रिटनमध्ये एक नविन विषाणू आढळून आलाय. यामुळं संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आढळून आलेल्या नवीन कोरोना विषाणूविषयीची महत्वाची माहिती एआयआयएमएसचे  संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या व्हायरसबद्दल गुलेरिया निरीक्षण केलंय. नवीन कोरोनाचा प्रादुर्भाव लंडन आणि दक्षिण ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. या नवीन कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने होत आहे. पण रुग्णांची गंभीरता वाढलेली नसल्याचं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

नवीन व्हायरसमुळे संसर्गाचा वेग वाढला आहे. जिथे जिथे व्हायरस असेल तिथे त्याचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने होतोय. म्हणूनच हा व्हायरस इतर देशांमध्ये पसरता कामा नये. यामुळेच अनेक देशांनी ब्रिटनची विमानसेवा बंद केली आहे. तसेच जे कुणी ब्रिटनमधून येत आहेत त्यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत आणि बारकाईने नजर ठेवली जात आहे, असं एम्सचे संचालक म्हणाले.

भारतात नवीन कोरोनाचा एकही रुग्ण आतापर्यंत समोर आलेला नाही. पण आता जे रुग्ण समोर येत आहेत त्यांची चाचणी करणं फार महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत आपण फक्त पॉझिटिव्ह आहे की नाही, हे तपासत होतो. मात्र आता आपल्याला काही प्रमाणात व्हायरसचा जेनेटिक सीक्वेन्सही बघावा लागणार असल्याचं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

फक्त इंग्लंडच नाही तर ‘या’ देशांमध्येही झालाय नव्या कोरोनाचा प्रसार

“ब्रिटनमधील नवीन विषाणूचे अस्तित्व अनेक देशात असण्याची शक्यता”

‘सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही पण…’; कोरोनाच्या नव्या विषाणूवर WHO दिली महत्वाची माहिती

कोरोना लसीचा धसका!; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उचललं मोठं पाऊल

धक्कादायक! लंडनमधून भारतात आलेल्या ‘त्या’ विमानात सापडले कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या