बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आह. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार यासंदर्भात पालकांना आणि विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. अशातच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना आणि त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्यात 17 ऑगस्ट पासून ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं परवानगी दिली असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचे लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, शाळा सुरू करण्याआधी शिक्षण विभागाकडून काही दक्षता घेण्यास सांगितली आहे. कोरोना मुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

“मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या ‘त्या’ प्रस्तावामुळेच आरक्षण रखडलं”

बार्सिलोना सोडल्यावर मेस्सी खेळणार ‘या’ क्लबकडून; कराराची रक्कम ऐकून व्हाल थक्क!

…तर आरक्षणाचं सर्व क्रेडिट केंद्र सरकारला देणार का?- प्रीतम मुंडे

“आता कळलं ठाकरे सरकारमधील ‘हे’ मंंत्री येड्या सारखं का बडबडतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More