मुंबई | लॉकडाऊन पुढेही सुरू राहिल्यास कोरोनामुळे नाही तर उपासमारीमुळे भारतात जास्त मृत्यू होतील, अशी भीती इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मुर्ती यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
एका मर्यादेनंतर करोना व्हायरसपेक्षा उपासमारीमुळे होणारे मृत्यू हे अधिक असतील. त्यामुळे भारत लॉकडाउनचा कालावधी अधिक काळ सुरू ठेवू शकत नाही हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, असं नारायण मुर्ती यांनी म्हटलं आहे.
कोरोना हा इतर आजारांप्रमाणे आपण आता स्वीकारायला हवा आणि लोकांना कामावर येण्यास परवानगी द्यायला हवी. मात्र त्याचवेळी याचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असणाऱ्यांची काळजीही घ्यायला हवी, असं मत नारायण मुर्ती यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, सध्या कोरोनाविरोधातील लस शोधण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्नही सुरू आहेत. पण ती लस भारतीय जीन्ससाठी अनुकुल आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही. हा आजार एका सामान्य आजाराप्रमाणेच आहे हे आपण मान्य केलं पाहिजे, असंही मुर्ती यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
शून्य संख्येनंतरच लॉकडाऊन उघडला जाईल हा विचार अशक्य- रघुराम राजन
“चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक दुवा निखळला, त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची हानी”
महत्वाच्या बातम्या-
“एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं; ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो”
“ऋषी कपूर म्हणजे प्रतिभा संपन्नतेचे शक्तीस्थळ”
लॉकडाऊन नंतर ‘या’ गोष्टीची मला चिंता वाटते- शरद पवार
Comments are closed.