बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रूग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अमानुषपणे मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ

दिसपूर | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचं दिसून येत आहे. बेड्स उपलब्ध होत नसल्यानं काही रूग्णांवर उपचार करणं शक्य होत नाही. तरीही अशा परिस्थितीत डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णांचा जीव  वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या काळात डॉक्टर आपल्या सगळ्यांसाठी देवासमान आहेत. असं असतानाही आसाममध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. रूग्णाच्या मृत्यूनंतर चक्क डॉक्टरलाच अमानुषपणे मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आसाममधील होजईमध्ये घडली असल्याचं समजत आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका डॉक्टरला रूग्णालयात मारहाण करत आहेत. डॉक्टरच्या अंगावरचे कपडे काढले असून, त्याला चारही बाजूने मारत आहेत. त्यातील एकजण पातेल्याने डॉक्टरच्या डॉक्यात मारत आहेत. तर दुसरा काठीने. तर काहीजण त्या डॉक्टरला लाथाही मारत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. मुख्यमंत्रींनी या प्रकरणाची स्वत: दखल घेतली असून, या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून आतापर्यंत याप्रकरणी 24 जणांना अटक करण्यात आली असल्याचं समजतंय.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या- 

रस्त्यावर थुंकणाऱ्यांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास द्यावा लागणार 1200 रुपये दंड

नागपूरात काळ्या बुरशीचं थैमान सुरूच; मृत्युच्या आकड्याचं शतक

मोठी बातमी! मुंबईत कोरोनावर उपयुक्त औषधांचा कोट्यवधींचा बनावट साठा जप्त

लेकरांना बंधाऱ्यात फेकून आई फरार, धक्कादायक कारण आलं समोर

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या आत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More