बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय संघाची चिंता वाढली! ‘हा’ प्रसिद्ध खेळाडू पोहोचला रूग्णालयात

नवी दिल्ली | पाकिस्तानने टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताचा दारूण पराभव केला आहे. विश्वचषकात आजपर्यंत अनेक असफल प्रयत्न केल्यानंतर पाकिस्तानने अखेर भारतीय संघाचा पराभव केला. कालच्या सामन्यानंतर क्रिकेट प्रेमी संघावर नाराज असताना आता भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

पाकिस्तानसोबतचा सामना गमावल्यानंतर आता भारतीय संघाला हार्दिक पांड्याच्या रूपात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सोबत झालेल्या सामन्यानंतर दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याला रूग्णालयात नेण्यात आलं आहे. फलंदाजी करताना हार्दिकच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असल्याचं बीसीसीआयच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

पांड्याने पाकिस्तानच्या विरोधात 11 धावांची खेळी केली पण खांद्याला दुखापत झाल्याने पांड्यानंतर गोलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. त्याच्या जागी इशान किशनने गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याला झालेली दुखापत कितपत गंभीर आहे. याचा अंदाज नसल्याने त्याला खबरदारी म्हणून स्कॅनसाठी रूग्णालयात नेण्यात आलं आहे.

भारतासमोर आता न्यूझीलंडचं आव्हान आहे. 31 ऑक्टोबरला भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या संघासाठी खुप महत्वाचा असल्याचं विराट कोहलीने पाकिस्तान विरूद्ध सामन्यापूर्वी सांगितलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

T-20 World Cup: भारताच्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पाहा गेल्या 24 तासातील दिलासादायक आकडेवारी

“ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर…”

तुम्ही पिताय तो चहा भेसळयुक्त चहा पावडरपासुन तर बनवलेला नाही ना?, असं ओळखा

T-20 World cup: पाकिस्तानी पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला कोहली, म्हणाला…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More