महाराष्ट्र मुंबई

ठाण्यात ऑफिसमध्ये घुसून पत्नीची चाकूने भोसकून हत्या, आरोपी पती अटकेत

भाईंदर | पत्नीच्या ऑफीसमध्ये घुसून आपल्या स्वत:च्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची भयंकर घटना ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे घडली आहे. या घटनेनंतर पत्नी वीणा भोईर यांना तात्काळ हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचा डाॅक्टरांनी सांगितलं.

भाईंदर येथे पश्चिमेकडे स्टेशन रोडवर असलेल्या वेंकेटेश्वर इमारतीत ही घटना घडली. वीणा भोईर ह्या ऑफिसमध्ये गेल्या असता पती अचानक ऑफिसमध्ये घुसला आणि चाकूने वार करत वीणा भोईर यांना जखमी केलं.

वीणा भोईर यांचा घटनास्थळी मृत्यु झाला तरीही त्यांना हाॅस्पिटमध्ये नेण्यात आलं, मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, हत्या करुन पती स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाला. भाईंदर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत आरोपीची कारवाई सुरु केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जॉर्ज फर्नांडिस यांनी देशातील कामगार चळवळीला नवी दिशा दिली- शरद पवार

ओवैसींना मोठा झटका, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कोर्टाचे तपासाचे आदेश

“आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे गद्दार आहेत”

-राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचं वक्तव्य

-बाप हा बाप असतो, बाप कसा बदलणार?, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या