Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

…अन् त्याने जखमी हाेऊनही स्वत:च्या रक्ताने लिहून ठेवला पुरावा

Photo Courtesy- News18 Lokmat Screenshot

पुणे | पुण्यातील नऱ्हेगाव भागात गाडी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरांना पकडतांना झालेल्या हल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, जखमी झालेल्या व्यक्तीने आपल्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास पुरावा रहावा म्हणुन जखमी अवस्थेत स्वत:च्या रक्ताने फरशीवर 4 चोर असं लिहुन ठेवलं होतं

प्रमोद घारे असं हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून ते सिद्धी संकल्प सोसायटी, नऱ्हे येथे राहतात. प्रमोद यांना पहाटे 3 च्या सुमारास गाडीच्या आवाजाने जाग आली आणि त्यांना 4 चोर गाडीची चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. त्यापैकी एकाला प्रमोद यांनी पकडलं. त्यानंतर, बाकी 3 जणांनी त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रमोदला चाकुने भोसकलं

प्रमोद जवळपास 3 ते 4 तास रक्ताच्या थारोळ्यात पार्किंगमध्ये पडून होता, तेव्हा त्याने आपला जिव गेल्यास मागे काहीतरी पुरावा रहावा या उद्देशाने स्वत:च्या रक्ताने चार चोर असं लिहून ठेवलं जेणेकरून पोलिसांना तपासात मदत होईल. पहाटे वॉकसाठी जाणाऱ्या लोकांना प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने जिवीतहानी टळुन त्याची प्रकृती आता चांगली आहे.

दरम्यान, सदरील घटनेनंतर प्रमोद घारे यांच्या पत्नीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नऱ्हे परिसरात सारख्याच चोरी आणि दरोड्याच्या घटना घडत असून गुन्हेगारांना गजाआड करण्यात पोलिसांना अद्याप यश आलं नाही.

थोडक्यात बातम्या-

कल्याणमध्ये राडा; काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिला आघाडीनं दिला चोप, पाहा व्हिडिओ

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात तडीपार गुंडांची हातात तलवार घेऊन दहशत, पाहा व्हिडिओ

‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’; ‘या’ भाजप नेत्याची गंभीर टीका

“महाराष्ट्राचे इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही”

धक्कादायक! साठ वर्षाच्या ‘या’ खासदाराने केलं 14 वर्षाच्या मुलीसोबत लग्न

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या