बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जखमी वाघिण जास्त घातक असते- ममता बॅनर्जी

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आल्या आहेत. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांचा समावेश आहे. यामधील पश्चिम बंगालमधील निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजप आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही पक्ष पुर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींच्या  जखमी झालेल्या ममता यांनी मैदानात उतरून भाजपला इशारा दिला आहे.

मला निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे. आपण व्हीलचेअरवर बसूनच राज्यभर उमेदवारांचा प्रचार करणार आहोत. मी जीवनात अनेक हल्ल्यांच्या सामना केला आहे.  मी माझी मान कधीच वाकवणार नाही. एक जखमी वाघिण अधिक घातक असते, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप तृणमूळ काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पण हा हल्ला नाही तर अपघात असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

दरम्यान, जखमी झालेल्या ममता बॅनर्जी व्हीलचेअरवर बसून त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या ममता जनतेला हात जोडून अभिवादन करत होत्या.

 

थोडक्यात बातम्या- 

आम्हाला आणखी पाच वर्षे द्या घुसखोरी पूर्णपणे संपवू- अमित शहा

“राजकारणात काहीही होऊ शकतं नाना पटोलेसुद्धा आमच्याकडे येऊ शकतात”

शरद पवारांनी केेलेल्या ‘त्या’ भाकीतावर देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले…

आई गेली देवाघरी तर बापाने सोडलं वाऱ्यावर, बहिणीसोबत राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीन उचललं धक्कादायक पाऊल

“शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More