Top News जालना महाराष्ट्र

‘लस घेतलेल्या लाभार्थ्यांची अशी पटणार ओळख’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

जालना | राज्यात फ्रंट लाईनच्या आठ लाख लोकांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असून कोरोना लसीकरणानंतर लाभार्थ्यांची ओळख पटण्यासाठी त्यांच्या बोटाला शाई लावणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली  आहे.

पहिल्या आठ लाख लोकांच्या लसीकरणासाठी जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. राज्यभरात लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला असून लसीकरणासाठी आता राज्य सज्ज असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.

लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे, असं सांगत तीन महिन्यात लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. तसेच केंद्र सरकार दोन लसींपैकी एकाच कंपनीची लस राज्याला देणार आहे असल्याची माहितीही टोपेंनी दिली.

दरम्यान, कोरोना लसीचा साठा, लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजचा खर्च आणि लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारनं द्यावा, अशी मागणीही टोपेंनी केंद्र सरकारकडे केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी केला ‘हा’ सवाल

औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

…तर 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीरपणे काँग्रेसला फटकारलं, म्हणाले…

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळून अपघात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या