प्रकरण चिघलळं, चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | महाराष्ट्रात सध्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहे. राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली.

मात्र, चंद्रकांत पाटलांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य प्रकरण आता चांगलंच चिघळलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड येेथे एका कार्यक्रमासाठी जात असताना चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी आता हे प्रकरण अधिकच पेटलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी फुले, आंबेडकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हा वाद सुरू झाला. शाळा सुरू करण्यासाठी सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं.

या वक्तव्यावरून चौफेर टीका झाल्यानंतर पाटलांनी माफी देखील मागितली होती. फुले-आंबेडकर माझ्या रक्तात असून वक्तव्याचा अर्थ वेगळा असल्याचं पाटील म्हणाले होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी या वक्तव्यावर दिलगीरी व्यक्त केल्यानंतरही त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-