लखनऊ | बाबरी खटल्यावर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलं होतं.
बाबरी मशिदीचं झालेलं पतन हे पूर्वनियोजित नव्हतं असं निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रात नोंदवलं असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
बाबरी विद्ध्वंस ही घटना पूर्वनियोजित नव्हती, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असं कोर्टाने नमूद केलं आहे. तसेच या मोठ्या राजकीय नेत्यांनी ही हिंसा रोखण्याचाही प्रयत्न केला होता. या घटनेबाबत कोणताही पुरावा नाही, असं असंही न्यायाधीश एस.के. यादव यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
“पोलिसांनी मला माझ्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही”
शशी थरूर यांनी धोनीशी केलेल्या तुलनेवर संजू सॅमसन म्हणाला…
युपी पोलिसांकडून मध्यरात्री पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा दावा
“जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार”