बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ प्रकरणात माझीही चौकशी करा; अजित पवारांचं खुलं आव्हान

पंढरपूर | निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लिहलेल्या एक पत्रावरून राज्यात पुन्हा राजकारण तापलं आहे. सचिन वाझेच्या या पत्राने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एवढंच नाही तर आता या पत्रात शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांवरून अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. माझं वाझेशी कधी संभाषण देखील झालं नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचं काही कारण नाही. तरीही माझं नाव का घेतलं हे मला माहिती नाही. माझं या प्रकरणात नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप खोटा आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

दर्शन घोडवट नावाचा एक व्यक्ती जो अजित पवार यांच्या अत्यंत जवळचा आहे. त्यांनी माझी भेट घेतली. घोडावट यांनी मला फोन नंबर सहित महाराष्ट्रात बेकायदेशीर गुटखा पुरवठा करणाऱ्यांची माहिती दिली. त्यातून मला महिन्याला 100 कोटी जमा करायला सांगितले. मी त्यांना नकार दिल्यावर त्यांनी मला पुन्हा नोकरी जाण्याची धमकी दिली, असा गौप्यस्फोट सचिन वाझे यांनी पत्रातून केला होता.

दरम्यान, सचिन वाझे यांच्या पत्रामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा प्रदीप शर्मा यांची देखील कसून चौकशी करत आहेत. तर अनिल देशमुख यांना देखील या सर्व प्रकरणाचा मोठा फटका बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘भविष्य मोलाचं पण जीव अनमोल आहे’; ‘एमपीएससी’ पुढे ढकलण्याची सर्व पक्षीय नेत्यांची मागणी

प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लसींचा तुटवडा जाणवला नसता- उदयनराजे भोसले

‘कोरोना लढ्यात राजकारण नकाे, राजकीय पक्षांना समज द्या’; उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

‘किमान संकट काळात तरी राजकारण करू नका’; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

काळजी घ्या! कोरोनाची ही नवी लक्षणं आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More