बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

मुंबई | मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला. या कारवाईचं नेतृत्व केलेले एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. या प्रकरणाला रोज वेगवेगळे वळण लागत असताना समीर वानखेडे यांच्यावर पंच प्रभाकर साईलने गंभीर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन ट्विस्ट आला आहे.

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर एनसीबीचे डिडिजी अशोक जैन यांनी साईलचे अॅफिडेविट वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले होते. तर आता याप्रकरणी नुकतीच चौकशी देखील सुरू झाली असल्याची माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी ज्ञानेश्र्वर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यानुसार आता समीर वानखेडे यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

25 कोटींची डील करून आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला. तर या डीलमधील 8 कोटी रूपये समीर वानखेडेंना जाणार होते आणि वानखेडेंकडून त्याच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही साईलने केला होता. प्रभाकर साईलने महासंचालकाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ज्या नावांचा समावेश आहे त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

दक्षिण-पश्चिम विभागाकडून एक अहवाल प्राप्त झाला, त्यानुसार चौकशीला सुरूवात झाली आहे. मुख्य दक्षता अधिकारी योग्य रितीने याप्रकरणाची चौकशी हाताळतील, पण कोणत्याही अधिकाऱ्यावर टिप्पणी करू नये, असंही ज्ञानेश्र्वर सिंह समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले आहेत. या प्रकरणाला आता काय वळण लागणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“शाहरुख खान सर तुम्ही भारत सोडून कुटूंबासोबत पाकिस्तानात येऊन स्थिर व्हा.”

भारत कालची मॅच हरल्यानंतर पंजाबमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

परिक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं असं काही की, वाचून शिक्षक गेले कोमात

मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘माझ्या मूळ गावी जाऊन…’

भारतीय संघाची चिंता वाढली! ‘हा’ प्रसिद्ध खेळाडू पोहोचला रूग्णालयात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More