बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काम हवं असेल तर निर्मात्यांना खूश करावं लागेल’; शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांना मनसेचा चोप

मुंबई | काही दिवसांपुर्वी शिकारी हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे कलाकारांना चित्रपटात काम देण्यासाठी लुभावलं जातं आणि नंतर त्यांचा शारिरीक फायदा घेतला जातो, यावर या चित्रपटात भाष्य केलं आहे. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. चित्रपटात काम देण्याच्या अमिशानं मुलींचा गैरफायदा घेतला गेला. त्यावर आता मनसेने मनसे स्टाईल कारवाई केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुलींसोबत गैरप्रकार करणाऱ्या परप्रांतियांना धडा शिकवला आहे. मुलींना चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत शारिरीक संबंध निर्माण केले जात होते. चित्रपटात एखादी भूमिका मिळवण्यासाठी निर्मात्यांना आणि डायरेक्टला खूश करा, अशी मागणी निर्माते, डायरेक्टर आणि कास्टिंग डायरेक्टर करत असल्याचं मनसेनं सांगितलं.

ठाण्याच्या हाॅटेलमध्ये येऊन तिघांना खूश करावं लागेल, अशी मागणी या लोकांनी केली होती. त्यानंतर तीन मुलींनी मनसेशी संपर्क केला आणि मनसेने खळखट्याक करण्याचा निर्णय घेतला. चोप दिलेला एक व्यक्ती आपण शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचं सांगून आमदार खासदारांची चांगली ओळख असल्याचं सांगत होता. याचाच फायदा घेऊन तो हे कृत्य करत होता. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

दरम्यान, मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाथ राणे यांनी यांचा व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली आहे. त्यात मनसेच्या महिला कार्यकर्त्या तिघांना चोप देताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“मुली रात्रभर बीचवर फिरतात याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही”

दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

गारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर!

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले

“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More