बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेरणादायी! घरी राहून 99 वर्षाच्या आजीनं केली कोरोनावर मात, नातू म्हणाला…..

चंदीगड | कोरोनानं देशभरात हाहाकार माजला आहे. अनेकजण कोरोनाशी दोन हात करताना दगावत आहेत तर काही कोरोनावर यशस्वीरित्या मात करत आहे. यातच एक प्रेरणादायी बातमी समोर येत आहे.

हरियाणातील एका 99 वर्षीय आजीनं कोरोनावर मात केली आहे. या आजीबाईंनी घरी राहूनच कोरोनावर विजय मिळवला आहे. या 99 वर्षाच्या वयोवृद्धेचा कोरोनाविरोधातील लढा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आजीबाईंच्या नातूनं सांगितलं की, आम्ही त्यांच्या सभोवताली प्राणवायू देणारी झाडं ठेवली. तसेच त्यांना फळे व पालेभाज्यांचा आहार दिला. आता त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. आजींच्या या कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये आशा सेविकांनी देखील मोलाची मदत केली

दरम्यान, कोरोनाला घाबरून आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पण दुर्दम्य ईच्छाशक्ती असेल तर कोरोनाला हरवणं शक्य आहे.अनेक वृद्धांच्या मनात कोरोनाविषयी मनात भीतीचं वातावरण आहे. कोरोनामुळे आजकाल सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. वयोवृध्द माणसं कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जास्त आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“हे सरकार नाही सर्कस आहे”; अनलॉकच्या संभ्रमावरून ठाकरे सरकारवर बोचरी टीका

‘गौतम गंभीर फाऊंडेशन’ कोरोनावरील औषधांची अवैध साठेबाजी प्रकरणात दोषी; हायकोर्टाचे कारवाईचे निर्देश

महाराष्ट्रात अनलॉक, पण पुणे जिल्ह्यात मात्र लॉकडाऊन कायम; जाणून घ्या कारण

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 200च्या खाली

सर्वात मोठी बातमी! राज्यातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये सर्व निर्बंध मागे, पाच टप्प्यात होणार अनलॉक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More