बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कमी वयात झालेला अपघात, जगण्याची लढाई अन् सुवर्णवेध, वाचा नेमबाज अवनीचा प्रवास!

टोकियो | भारतीय नेमबाज अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत 10 मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदाचा वेध घेतला. पॅरालिम्पिकच्या इतिहासात 249.06 इतक्या विश्व विक्रमी गुणांची कमाई करत सुवर्णपदक मिळवलं. लेखराने पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला पहिलंवाहिलं पदक मिळवून दिलं आहे. मात्र तिचा संघर्ष तितकाच प्रेरणादायी आणि काट्याकुट्यानं भरलेला आहे.

राजस्थानतीमधील जयपुर जिल्ह्यात 8 नोव्हेंबर 2001 रोजी अवनीचा जन्म झाला. त्यानंतर वयाच्या 11 वर्षीच अवनीच्या कुंटुबासह कारचा अपघात झाला. त्यात तिच्या पाठीचा मणका मोडला अन् ती आयुष्यभरासाठी व्हिलचेअवर आली. परंतु तिने हार मानली नाही. अवनीने शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं मात्र शिक्षणातही मन रमत नाही. त्यानंतर तिचे वडिल 2015 साली नेमबाजी आणि तिरंदाजी शिकवण्यास घेऊन गेले.

नेमबाजीचं प्रशिक्षण घेतल्यानंतर अवनीने राजस्थानमधील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. काही महिन्यानंतरच तिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले. 2016 ते 2020 या कालावधीत अवनीने राष्ट्रीय स्पर्धेत एकुण 5 सुवर्णपदाकावर नाव कोरलं. आता टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक मिळवून देशाचा सन्मान वाढवला.

दरम्यान, कमी वयात झालेला अपघात त्यानंतर जगण्याची लढाई, आणि आयुष्यात उभं राहण्यासाठी केलेली धडपड. त्यानंतर या सगळ्या संघर्षातून पॅरालिम्पिकमध्ये साधलेला सुवर्णवेध. हा संघर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जगण्याची प्रेरणा देणारा ठरत आहे.

थोडक्यात बातम्या- 

काय सांगता! हवेत तरंगतोय पिझ्झा?, व्हिडीओ तुफान व्हायरल

“चंद्रकांत पाटील पलंगावरून पडले तरी, त्यांना सरकार पडल्यागत वाटत असेल”

भारताला धक्का! पॅरालिम्पिकमधील विनोद कुमारांचं कांस्यपदक काढून घेतलं

आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन घेऊन जाणं होणार सोपं, पाहा व्हिडीओ

धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक खेळलेल्या ‘या’ खेळाडूने घेतला तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय !

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More