बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वाय’ चित्रपटाने प्रेरित होत कोल्हापुरातील दाम्पत्याने साजरा केला बारशाचा अनोखा कार्यक्रम

कोल्हापुर | मोकळा श्वास, काकस्पर्श, दशक्रिया यासारख्या चित्रपटांनी समाजांच्या डोळ्यात अंजन घातलं. यासारख्या सामाजिक चित्रपटांमुळे समाजाच्या दृष्टीकोणात बराच बदल घडतो आणि याची प्रचिती पुन्हा एकदा ‘वाय'(Y) चित्रपटाच्या निमित्ताने आली. वाय हा मराठी चित्रपट 24 जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्त्रीभ्रुण हत्येवर भाष्य करणारा आहे.

अनेक महिलांनी चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे अनुभव ‘वाय’ टिम सोबत शेअर केले आहेत. या चित्रपटाने प्रेरित होत कोल्हापुरातील देशमाने दाम्पत्याने त्यांच्या मुलीचं बारसं धुमधडाक्यात साजरं न करता थिएटरमध्ये ‘वाय’ चित्रपट दाखवून केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी चित्रपटातील मुक्ता वर्बेच्या पात्राशी प्रेरित होऊन मुलीचं नाव देखील मुक्ता (Mukta) ठेवलं आहे.

या चित्रपटाच्या कथेत आणि माझ्या आयुष्यात खूप साम्य असल्याचं सौ. देशमाने म्हणाल्या. तर त्यातील वाक्य मी अनुभवली आहेत. हा चित्रपट पाहून मुलगी म्हणजे ओझे मानणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत थोडा जरी फरक पडला, तर आमचा हेतू साध्य झाल्याचा आम्हाला आनंद होईल. त्यामुळे आम्ही ‘मुक्ता’चं बारसं (Naming Ceremonny) अशा पद्धतीने करण्याचे ठरवेल, असंही त्या ‘वाय’ टिमशी बोलताना म्हणाल्या.

दरम्यान, मुक्ता म्हणजे मुक्त, जीला कशाचंही बंधन घालू शकत नाही अशी. हा विचार लोकांपर्यत पोहचावा म्हणून असा निर्णय घेतला. त्याशिवाय आणखी एक कारण म्हणजे ‘वाय’ मधील प्रमुख अभिनेत्री मुक्ता बर्वे. ती स्वतः एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, ‘वाय’मधील तिचा धाडसीपणाही मनाला भिडणारा आहे, अशी प्रतिक्रिया देशमाने यांनी दिली आहे. तर देशमाने दाम्पत्याच्या या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक (Appreciation)  होत आहे.

 

कोल्हापूरमधील ‘वाय’ सिनेमापासून प्रेरित झालेल्या आई-वडिलांनी सिनेमाच्या शो चे आयोजन करत शो दरम्यान मुलीचे बारसे करत ‘मुक्ता’ हे नाव ठेवले.

खूप खूप धन्यवाद!

आताच बुक करा तिकिटं इथे: https://t.co/Rlc8ROFXbE #InCinemasNow #Y #YTheFilm pic.twitter.com/pCHvk6Qd5G

— Y The Film (@YtheFilm) July 5, 2022

थोडक्यात बातम्या

‘एखाद्या हिरोईन सोबत लग्न लावून दे ना’, चाहत्याच्या अजब मागणीला सोनू सूदचं भन्नाट उत्तर

शिवसेनेत मोठे बदल, उद्धव ठाकरेंनी घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Koffee With Karan 7: दीपिकाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे आलिया ट्रोल

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?, मुख्यमंत्री शिंदेंकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

श्रीलंकेत पुन्हा एकदा जाळपोळ, संतप्त नागरिक रस्त्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More