Top News महाराष्ट्र मुंबई

14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी दोन मुलं; तरीही IPS होण्यापासून तिला कोणी रोखू शकलं नाही!

मुंबई | आपल्या ध्येयाचा पाठलाग करताना आपली इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो. अशाच प्रकारे एका महिलेने आयुष्याच्या वाटेवर अनेक काटे, संकटे आणि अडथळे आले मात्र तिने आपल्या जिद्दीच्या जोरावर आपलं स्पप्न पुर्ण केलं.

तामिळनाडूमधील आयपीएस अधिकारी असलेल्या अंबिका यांनी आपल्या कर्तृत्वाने देशभरातील मुलींसमोर आदर्श ठेवला आहे. वयाच्या 14व्या वर्षी पोलीस कॉन्स्टेबलशी लग्न झालं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतरच 18व्या वयात त्या दोन मुलांच्या आई बनल्या. मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही.

10 वी आणि नंतर डिस्टंस लर्निंगद्वारे पदवी पूर्ण केली. एवढं सगळे त्यांनी घर, संसार सांभाळून केलं तेव्हा कुठे ती आयपीएस बनण्यास पात्र ठरल्या. डिंडीगुलमध्ये आयपीएस परिक्षेसाठी कोणतेही कोचिंग सेंटर नव्हतं. त्यानंतर अंबिका यांनी चेन्नईमध्ये राहून सिव्हिल सर्व्हिस परिक्षेची तयारी करण्याचे ठरवलं.

पतीनेही तिला साथ दिली. जेव्हा अंबिका चेन्नईला राहत होत्या तेव्हा त्यांचे पती नोकरी करत मुलांनाही सांभाळत होते. अंबिका आयपीएसची परिक्षा एकदा नाही तर तिनदा नापास झाल्या. मात्र त्यांनी हार मानली नाही. शेवटची संधी म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि 2008 मध्ये  पासही झाल्या. ट्रेनिंगनंतर त्यांनी पहिली पोस्टिंग महाराष्ट्रात मिळाली आहे.

थोडक्यात बातम्या-

“दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार”

दिल्लीतील शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू

सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?- संजय राऊत

संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकला होता पोलीस कर्मचारी, मदतीसाठी एक शेतकरीच धावला

रेणू शर्माने बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या