बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जिद्दीला सलाम! वडिलांचा मृतदेह समोर असताना मंगलने दिली CA ची परीक्षा

पुणे | प्रत्येकाची काही न काही तरी स्वप्न असतात. पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करणारे, झटणारे फार कमी लोक असतात. अशाच लोकांमधील पुण्यातील लोहियानगर या भागात राहणारी मंगल गायकवाड आहे. मंगल सध्या (सीए) चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स करतीये.

प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यावर मात करून ती या कोर्सच्या अंतिम टप्प्यात आता पोहोचली आहे. ‘सलाम पुणे’नं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मंगलची प्रेरणादायीकथा सगळ्यांसमोर आणली आहे.

आजवर माझ्या घरच्यांनी जे भोगलं आहे त्यातून मला त्यांना बाहेर काढायचं आहे. चांगलं आयुष्य द्यायचं आहे, असं मंगलने म्हटलं आहे. काही काळापूर्वीच मंगलच्या वडिलांचं निधन झालं. यावेळी त्यांचा मृतदेह दारात असताना तिनं काळजावर दगड ठेवत परीक्षा दिली होती.

मंगलला बारावीतलया गुणवत्तेमुळे 25 हजारांची शासकीय स्कॉलरशिप मिळाली. ती घेऊन तिनं पुढच्या परीक्षा दिल्या. क्लासेस केले. काही परीक्षांच्या क्लासेससाठी पूनमच्या काकांनी कर्ज काढलं आणि तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.

पाहा व्हिडिओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Salaam Pune (@salaampune)

थोडक्यात बातम्या-

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

एक महिन्याच्या मुलीचा आईनेच घेतला जीव; कारण ऐकून सुन्न व्हाल

आणीबाणीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…

“…त्या महिलांचीच चुकी आहे; मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत”

…अन् भररस्त्यात तो वाजले की बारावर थिरकला; रिक्षावाल्याच्या लावणीवर तुम्हीही व्हाल फिदा, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More