नवी दिल्ली | खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या काळापासून गरजूंचा संकटमोचक ठरला आहे. सोनू सूद यांनी केलेल्या मदतीची चर्चा होत आहे, कारण नुकतेच एका कराटे अॅथलेटिक्सची शस्त्रक्रिया मोफत झाली.
सोनू सूद यांनी ताजनगरीतील डॉ. अखिलेश यादव यांना फोन करून सर्व माहिती दिली. आर्थिक अडचणीमुळे डॉक्टरांनी एका खेळाडूची शस्त्रक्रिया मोफत केली. जानेवारी महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील कराटे अॅथलेटिक्स खेळाडू लिगामेंट तुटलं.
Pride of our country had a successful surgery yesterday in Delhi. Thank u @DRAKHIL66570451 we need more heroes like you.
Medal 🏅 for our country is on our way. 🤞
Jai Hind 🇮🇳 https://t.co/2P7XpghwHV— sonu sood (@SonuSood) September 2, 2020
कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यांना उपचार करता येत नव्हते. त्यानंतर त्यांनी सोनू सूदकडे ट्विटरद्वारे मदत मागितली. सोनू सूद यांनी डॉ. अखिलेश यांना सर्व परिस्थितीविषयी सांगितलं आणि कालच ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.
डॉ. अखिलेश यादव उत्तर प्रदेशातील असे पहिले डॉक्टर आहे की, ज्यांनी गुडघा आणि हिप प्रत्यारोपणमधील सर्जन आहे. याचे प्रशिक्षण त्यांनी प्रसिद्ध डॉ. चित्रंजन राणावत यांच्याकडून घेतले आहे. डॉ. अखिलेश यांनी आतापर्यंत ४,००० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘आई आहे ही मुंबई, खाऊन भरल्या ताटात…’; कंगणाच्या त्या ट्विटवर केदार शिंदे भडकले
भारतीय शास्त्रज्ञांनी उभारला जगातील सर्वात मोठा सोलर ट्री!
सुशांत सिंह प्रकरणी ‘या’ क्रिकेटरच्या मेव्हण्याची सीबीआयकडून चौकशी!
Comments are closed.