बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फेसबुकला मोठा फटका, कंपनीची ‘ही’ सेवा ठप्प झाल्याने यूझर्सचीही मोठी नाराजी

नवी दिल्ली | फेसबुकने विकत घेतलेलं प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामची सेवा काल जगभरात काही काळासाठी ठप्प झाली होती. या प्लॅटफॉर्मवर यूझर्सना अडचणी येत होत्या, मात्र काही काळातच या सेवा सुरळीत करण्यात आल्या.

इन्स्टाग्राम ओपन करताच ते ओपन न होताच डायरेक्ट क्लोज होत असल्यामुळे यूझर्सना अडचणी येऊ लागल्या. स्टोरी टाकण्यात, इन्स्टावर फोटो अपलोड करण्यास तसेच इतर सोयींचा लाभ घेण्यामध्ये यूझर्सना अडचणी येऊ लागल्या.

झालेल्या प्रकरणामुळे आता इन्स्टाग्रामवर तसेच ट्वीटरवर देखील इन्स्टाग्राम डाऊन अशाप्रकारे दोन हॅशटॅग ट्रेंड होताना पहायला मिळाले. यूजर्सनी नाराजी तर व्यक्त केलीच मात्र फेसबुक आणि संबंधित सेवांची मिम्सद्वारे खिल्ली देखील उडवलेली पहायला मिळाली.

दरम्यान, काही काळानंतर सेवा पूर्ववत होताच पुन्हा या तिन्ही सेवांचे फीचर्स चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं दिसलं, मात्र काही काळ झालेल्या या गैरसोईनं अनेकजण अस्वस्थ झाल्याचं देखील पहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या-

डावललं; भाजप नेत्याचं प्रश्नचिन्ह!

शरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे पिता-पूत्रांनी गाठलं ब्रीच कँडी रुग्णालय

कोरोनाविरुद्ध कठोर पावलं उचला नाहीतर… केंद्र सरकारचा राज्यांना मोठा इशारा

व्हिडीओ कॉल उचलताच तरुणी कपडे काढू लागली, त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

मित्राच्या गर्लफ्रेंडला घरी बोलावून दारु पाजली, त्यानंतर केला बलात्कार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More