बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Instagramद्वारे आता कमवा बक्कळ पैसा, कंपनीनं केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा

मुंबई | मेटा कंपनीचं फेसबुक, वॉट्सअपसोबतच सर्वात पॉप्युलर असलेलं सोशल मीडिया अॅप म्हणजे Instagram आपल्या क्रिएटर्सना आता पैसे कमवण्याची संधी देणार आहे. कंपनीने नुकतीच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून काही क्रिएटर्सना तात्पुरत्या स्वरुपात ही सेवा चाचणीसाठी प्रदान करण्यात आली आहे. ( How to earn money via instagram reels )

इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग अॅप म्हणून नावारुपाला आलं होतं. त्यानंतर आधीच्या फेसबुक आणि नंतर नाव बदललेल्या मेटा कंपनीनं ते खरेदी केलं आणि त्यावर रिल्स हे नवं फीचर आणलं. टिकटॉक हे शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अॅप ज्यावेळी भारतात बंदीचा सामना करत होतं, त्यावेळी इन्स्टाग्रामनं संधी साधत रिल्सचं जोरदार प्रमोशन केलं, आज तरुणाईमध्ये रिल्स चांगलेच फेमस झाले आहेत.

दरम्यान, टिकटॉकवर कन्टेंट क्रिएटर्सना पैसे कमवण्याची संधी देण्यात आली होती. आता त्याच धर्तीवर इन्स्ट्राग्रामनं देखील अशाच प्रकारची सुविधा देऊ केली आहे. कंन्टेन्ट क्रिएटर्सना आता पेड सबस्क्रायबर घेण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे, याअंतर्गत 99 डॉलर्सपर्यंत सबस्क्रीप्शन शुल्क ठेवता येऊ शकतं.

अमेरिकेतील काही क्रिएटर्ससोबत या फीचर्सचं टेस्टिंग सध्या करण्यात येत आहे. त्यांच्या सूचनांनंतर काही बदल करुन किंवा त्याशिवाय हे फीचर्स इतर वापरकर्त्यांसाठी देखील खुलं केलं जाणार आहे. या फीचर्सचा वापर करुन चांगल्या क्रिएटर्संना लाखो रुपये कमावता येऊ शकतात, असा सोशल मीडियातील जाणकारांचा अंदाज आहे.

थोडक्यात बातम्या-

हाॅलिवूडला मोठा धक्का! Marvelच्या सिरिजमधील अभिनेत्याचा अपघाती मृत्यू

Tata Motorsच्या सर्वच गाड्यांच्या किंमतीत मोठे बदल, आत्ताच जाणून घ्या नव्या किंमती

निव्वळ आनंद! किरण माने यांना मिळाला नवा चित्रपट, साकारणार ‘ही’ भूमिका

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट, डाॅक्टर म्हणाले…

पुढील 2-3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More