रिल स्टार ‘माऊ’ घरातून अचानक गायब; सुसाईड नोट सापडल्याने खळबळ

Mayuri Pawar | सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेली इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर ‘माऊ’ अचानक गायब झाली आहे. घरात तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडल्यामुळे कुटुंबीयांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. घरी कुणालाही काहीच न सांगता माऊ निघून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर तिचे 13 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिच्याबद्दल ही धक्कादायक माहिती कळल्यानंतर तिच्या चाहत्यांना  धक्काच बसला. यानंतर पोलिसांकडून तिचा तपास करण्यात आला.अखेर तीन दिवसांनी तिचं लोकेशन पोलिसांना सापडलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

नेमकं प्रकरण काय?

इन्स्टाग्रामवर ‘माऊ’ या नावाने प्रचलित असलेली मयुरी पवार ही 15 जूनरोजी घरातून कोणालाही काहीच न सांगता निघून गेली होती. तिने घरात लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडल्यामुळे कुटुंबाला धक्काच बसला होता.

यानंतर दोन दिवसांपूर्वी कोथरूड येथे माऊचं लोकेशन ट्रेस झालं आणि तिचा ठावठिकाणा लागला. कोथरूड येथे 18 जूनला सायंकाळी तिचं लोकेशन पोलिसांना डिटेक्ट झालं.

मात्र, अजूनही ती घरातून का गायब झाली होती, तिने अशा प्रकारे सुसाईड नोट का लिहिली आणि त्यात काय लिहिलं होतं, याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. पण, माऊ (Mayuri Pawar) सुखरूप असल्याची माहिती कळताच तिचे चाहते आनंदी झाले आहेत.

कोण आहे मयुरी पवार उर्फ ‘माऊ’?

मयुरी चैतन्य मोडक-पवार (Mayuri Pawar) ही प्रसिद्ध इन्स्टाग्राम रील स्टार असून तिला ‘माऊ’ या नावाने देखील ओळखले जाते.तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास 1.3 मिलियन म्हणजेच 13 लाखांहूनही जास्त फॉलोअर्स आहेत.फेमस नाही व्हायचं आपल्याला लोकांसाठी फेव्हरेट व्हायचंय, असं कॅप्शन तिने इन्स्टाच्या बायोमध्ये लिहिलं आहे.तिची ‘दुर्गा ग्रुप’ या नावे एक संस्था देखील आहे.

News Title-  Instagram influencer Mayuri Pawar aka mau missing case

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ; ‘या’ माजी खेळाडूने संपवलं जीवन

Google Chrome वापरणाऱ्यांना सरकारचा अलर्ट, ‘या’ मोठ्या धोक्यापासून केलं सावध

“40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचं कमोड..”; आलिशान पॅलेसमुळे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अडचणीत

सुजय विखेंना पराभव पचेना; घेतला मोठा निर्णय, निलेश लंकेंविरोधात…

‘आम्हाला भिडवत ठेवलं तर… ‘; मनोज जरांगेंचा थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा