बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर लग्नात नवरीचे ठुमके अन् वऱ्हाडी तर पाहतच राहिले; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल दिवसेंदिवस सोशल मीडियामध्ये वेगवेगळे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कोणाच्या लग्नाचे, वाढदिवसाचे अन्य कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहून सर्वजण आकर्षित होतात. तर दुसरीकडे लग्न म्हणलं तर प्री-वेडिंग, वेडिंग फोटोशूट आणि व्हिडीओ शूट केले जातात. त्यातच आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

एका लग्नातील व्हि़डीओ हा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लग्नात नवरदेव आणि नवरी सोफ्यावर बसले असताना अचानक नवरी उठून तिच्यासाठी इच्छा पुर्ण करण्यात लागलेल्या गाण्यावर नाचू लागते. नवरी ज्या हावभावाने नाचत आहे, त्यामुळे सर्वांनाच तिचा डान्स मनापासून आवडला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ केरळच्या एका लग्नातील असल्याचं कळत आहे. केरळमध्ये लग्न हे काहीसे सणसमारंभाप्रमाणे साजरे केले जातात. जेव्हा नवरी नाचण्यासाठी उठते आणि नाचते त्यावेळी नवऱ्याचा चेहरा हा पाहण्यासारखा झाला होता. नवरी नवऱ्याकडे पाहून वेगवेगळ्या प्रकारे हातवारे करत नाचताना पाहून नवरदेवही खूश झालेला दिसत आहे.

दरम्यान, इन्स्टाग्रामवरच्या नोझ वेडिंग क्रिएशन्स या अकाउंटवर या नवरीच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओनं नेटकऱ्यांना भूरळ घालत आहे. या व्हिडीओला जवळपास साडेतीन लाख लोकांनी लाईक केला आहे. तर, 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

 

थोडक्यात बातम्या –

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आयफोन 13’ची बुकिंग

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

अनिल देशमुखांना क्लिनचीट? सुप्रिया सुळे म्हणतात…; पाहा व्हिडीओ

मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन; नियम मोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न

ईडीच्या नोटीस नंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…; पाहा व्हि़डीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More