बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! आता व्हॉट्सअॅपवरून कर्जही काढता येणार, वाचा सविस्तर

नवी दिल्ली| कर्ज काढायचं म्हटलं की त्यासाठी अनेक कागदपत्रही गोळा करावी लागतात. कितीही कागदपत्र जमा केली तरी एखादं महत्त्वाचं दस्तावेज विसरतंच. मात्र, आता या कोणत्याही अडचणी शिवाय कर्ज काढता येणार आहे.

लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळख असणाऱ्या व्हाटस्अॅपवरूनही कर्ज काढता येणार आहे. व्हॉट्सअॅपचा वापर आपण मेसेजेस साठी करतो. त्यानंतर आता व्हाटस्अॅपने एक नवीन फीचर अॅड केलं त्यानुसार तुम्ही व्हाटस्अॅप वरून ऑनलाईन पद्धतीने पैसे सुद्धा पाठवू शकता.

व्हॉट्सअॅपने अजून एक नवं फीचर अॅड केलं असून आता तुम्हाला व्हाटस्अॅपवरून कर्ज देखील काढता येईल. यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही. व्हाटस्अॅप अग्रगण्य क्रेडिट फार्म ‘CASHe’ कडून एक विशेष क्रेडिट फीचर केलं आहे. त्यामुळे आता व्हाटस्अॅप यूजर्सना काही मिनिटांत कोणत्याही अडचणीशिवाय कर्ज मिळू शकणार आहे. या फीचरमुळे व्हाटस्अॅप बिझनेस प्लॅटफॉर्म युजर्स फक्त 30 सेकंदात कर्ज घेऊ शकतात. जर तुम्हाला कर्ज घ्येयचा असेल तर तुम्हाला +91 80579 53191 या व्हाटस्अॅप क्रमांकावर मेसेज करावा लागेल. तुम्हाला या नंबरवर hi असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि नंतर काही पडताळणी प्रक्रीयेतून जावं लागेल.

दरम्यान, व्हॉट्सअॅप बिझनेस युजर्सना प्री -अप्रिव्ह्यू कर्ज दिले जाईल. ही Industry First पहिली क्रेडिट लाईन सुविधा आहे, जी एआय-पावर्ड आहे. तसेच या सुविधेचं तुम्हाला 24\7 लाभ घेता येईल. केवळ पगारदार ग्रहकच या फिचरचा लाभ घेता येईल. याची तपासणी केवायसी आणि एआय-पावर्ड मोडद्वारे पूर्ण केली जाईल. या नंतर तुमची क्रेडिट लाईन ठरवली जाईल आणि नंतर तुम्हाला किती रुपयांचं कर्ज मिळू शकेते ते ठरवलं जाईल. आणि मग कर्ज तुमच्या खात्यावर पाठवले जाईल.

थोडक्यात बातम्या-

“पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षात सर्वकाही अलबेल आहे असं भाजपने समजू नये”

अभिनेत्री केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर, पण ‘या’ कारणामुळे मुक्काम तुरुंगातच

2024च्या लोकसभा निवडणुकाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘एखाद्याच्या अंगात येतं तसं संजय राऊतांच्या अंगात आलं आणि…’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ची कोट्यवधींची कमाई, आकडा ऐकून थक्क व्हाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More