बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केवळ 17 मिनटात पार पडला विवाह सोहळा; नवरदेवानं हुंड्याऐवजी मागितलं ‘हे’ अनोखं गिफ्ट

लखनऊ | महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा फैलाव वेगानं होत आहे. त्यामुळे सरकारने अनेक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात दोन तर दोन तासात लग्न समारंभ आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अनेक राज्यात देखील लग्नसमारंभावर निर्बंध लावले गेले आहेत. अशातच आता उत्तप्रदेशातील एका जोडप्यानं केवळ 17 मिनटात लग्न केलं आहे.

कलान ठाण्याच्या क्षेत्रातील सनाय गावाचे रहिवासी असलेल्या पुष्पेंद्र हे गावातच शिक्षण संस्था चालवतात. त्यांचा विवाह हरदोईच्या प्रीति तिवारी हिच्यासोबत ठरला. कोरोना परिस्थितीत पुष्पेंद्र यांंनी वरातीस आणि हुंडा घेण्यास नकार दिला होता. कोरोना कर्फ्यू दरम्यान ठरलेल्या मुहूर्तावर पटना देव कली येथील शिव मंदिरात दोघांनी सात फेरे घेत अवघ्या सतरा मिनिटांमध्ये लग्नसोहळा पार पाडला.

सतरा मिनीटात लग्नाबरोबरच हे लग्न आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिलं. नवरदेवानं या आधीच हुंडा घेण्यास नकार दिला होता. त्याऐवजी त्यानं सासऱ्याकडं एक गिफ्ट मागितलं. शेवटी सासरकडच्या मंडळींनी खूप आग्रह केल्यामुळे नवरदेवानं हुंडा नको म्हणून केवळ एक रामायण मागितलं. अनावश्यक खर्च आणि हुंडा घेण्याची प्रथा मोडीत काढत साध्या पद्धतीनं लग्न करावं, असं आवाहनही वरवधूने केलं आहे.

दरम्यान, या निर्णयाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. आजही अनेक ठिकाणी हुंडा घेण्याची अनिष्ठ प्रथा चालूू आहे. हुंडा घेण्यावर बंदी असताना देखील आजही हुंडा घेतला जातो. त्यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ भाजप नेत्याचं सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केलं तोंडभरून कौतुक

‘लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा लस दान करा’; WHO नं दिला महत्वाचा सल्ला

तौत्के चक्रीवादाळाचं संकट; NRDF च्या 10 टीम्स ‘या’ भागात तैनात

‘शंभर बॅनरची पीआर मात्रा हेच शिवसेनेचं कर्तृत्व’; अतुल भातखळकर यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

सेकंडहँण्ड कारसाठी आई-बापानं पोटच्या मुलासोबत जे केलं ते ऐकून पोलिसही हादरले!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More