बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

योगी सरकारचा गजब कारभार! उद्घाटनात नारळ फोडायला गेले अन् रस्ताच फुटला

नवी दिल्ली | नारळ फोडून उद्घाटन करण्याची पारंपारिक पद्धत आपल्याकडे आहे. पण नारळ भ्रष्टाचार (Corruption) उघड करू शकतो हे आता नव्यानंच समोर आलं आहे. पण उत्तर प्रदेशात नारळ फोडल्यावर चक्क रस्ताच फुटल्याची (Break The Road) घटना घडली आहे. त्यामुळे योगी सरकारचा ठिसाळ कारभार देखील समोर आला आहे.

उत्तर प्रदेश राज्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण तिथं लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी उत्तर प्रदेशमधील सत्तधारी योगी सरकारनं (Yogi Government) काम करण्याचा सपाटा चालवला आहे. अशातच बिजनौरमध्ये एक रस्त्याचं प्रकरण समोर आलं आहे. बिजनौर सिंचन विभागानं कालव्याजवळ तब्बल 1 कोटी 16 लाख रूपये खर्च करून रस्ता तयार केला होता.

रस्त्याच्या उद्घाटनासाठी आमदार सूची मौसम चौधरी यांना उद्घाटक म्हणून बोलवण्यात आलं होतं.  आमदारानं उद्घाटन करण्यासाठी नारळ फोडला पण भलताच प्रकार घडला. नारळ फुटण्याऐवजी चक्का नवा केलेला रस्ता फुटला. नारळाच्या जोराच्या फटक्यानं रस्त्यावरील डांबर बाजूला पडलं परिणामी आमदार चौधरी नाराज होवून त्या ठिकाणावरून परत आल्या. सध्या सर्वत्र या रस्त्याची चर्चा आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच हा प्रकार घडल्यानं सर्वत्र सध्या उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षात कशी काम झाली असतील याची चर्चा होत आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारनं दिलं आहेत.

थोडक्यात बातम्या 

‘…मग मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो का?’; अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

Mayank Agarwal ची बॅट तळपली! शतक ठोकत उडवला किवीं गोलंदाजांचा धुव्वा

शरद पवार यांच्यासोबत क्रिकेट सामना पाहण्याची संधी, रुपाली चाकणकर म्हणतात…

एसटी कर्मचाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई होणार, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

लवकर वसतिगृहे चालू करा! स्टुडंट हेलपिंग हँड व छात्रभारतीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More