कोल्हापूर | कोल्हापूरच्या एका भाजप (Bjp) नेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओत हा नेता भाषणात महात्मा फुले (Mahatma Phule) यांचं नाव घ्यायला जातो पण थेट निळू फुले यांचं नाव घेतो. या नेत्याचं नाव शिवाजीराव पाटील असं आहे.
बोलताना शाहू, फुले, आंबेडकर असं म्हणण्याऐवजी ‘शाहू, निळू फुले, आंबेडकर यांना मानाचा मुजरा’ असं धक्कादायक वक्तव्य शिवाजीराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे
दरम्यान, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करुन…तसेच शाहू, निळू फुले, आंबेडकर यांना मानाचा मुजरा करुन..”, असं म्हणत शिवाजीराव पाटील आपल्या भाषणाची सुरुवात करतात.
भाषणातील हा अवघ्या काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यांच्यावर सडकून टीका केली जातेय.
महत्वाच्या बातम्या-
- मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दिलासा
- “उद्धव ठाकरे हा महाफडतूस माणूस आहे”
- …तर मी 100 टक्के बारामतीमधून लोकसभा लढवेन- तृप्ती देसाई
- ‘… आव्हाड तेव्हा तुमची माणूसकी कुठे गेली होती?’; चित्रा वाघ यांनी सुनावलं
- “ईडी, सीबीआय बाजूला ठेवून या, काडतूस कुठं घुसतं ते दाखवतो”