अमरावती महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना फी साठी सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे- बच्चू कडू

अमरावती | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच शुल्क घ्यावी, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू यांनी केली आहे. कोरोना संकटकाळात शिक्षण संस्था एक वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाही का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये शाळांकडून पालकांना फी भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या तक्रारींची दखल घेताना बच्चू कडू यांनी घेतली आहे.

ज्या संस्था या पालकांच्या भरवश्यावर मोठ्या झाल्या अशा संस्था फक्त एक वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाही का? जर तुम्ही सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे हे शिक्षण संस्थांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे.

कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांच्यासोबत शिक्षण संस्थांनी उभे राहावे, त्यांना समजून घेऊन सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी केली.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

चहा पिताना एकमेकांकडे पाहणं पडलं महागात, तिघांनी तरूणावर कोयत्याने केले वार

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत…., ग्रामविकास मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

आज ६७११ रूग्ण बरे होऊन घरी, तर राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर- राजेश टोपे

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत, पंतप्रधान मोदींची ग्वाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या