बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या सरकारला ‘या’ सूचना

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरुवातीला विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात दिवसा संचारबंदीचे आदेश लागू केले. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्रात किमान 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भातली माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

महाराष्ट्रात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हाच एक पर्याय असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला लॉकडाऊन संदर्भात काही सूचना केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महत्त्वाच्या सूचना करत आपलं निरिक्षण नोंदवलं आहे.

1. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी संपूर्णतः कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यावर विचार करा.

2. महाराष्ट्रात कमीत कमी 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं.

3. त्यानंतर, नागरिकांना कोरोनाच्या परिस्थितीचं गांभीर्य नसल्याने त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.

4. महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन केल्याने कोरोना रुग्णसंख्या नक्कीच कमी होईल.

मुंबई उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारला करत आपलं निरीक्षण वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर नोंदवलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर न्यायालयाने केलेल्या सूचनांचा कितपत विचार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

राहुल बजाज यांचा बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

“आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?”; गोपीचंद पडळकर यांची राजेश टोपेंवर टीका

पुण्यात शववाहिकांचा तुटवडा; प्रादेशिक परिवहन विभागाने ‘या’ वाहनांना दिली शववाहिकेची परवानगी

लसीचे 2 डोस घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह पण पूर्णपणे ठणठणीत- मुख्यमंत्री अशोक गहलोत

“संसद भवन महत्त्वाचं की नागरिकांचं लसीकरण?”; पवारांचा रोखठोक सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More