‘या’ 3 मोठ्या बँकांचा ग्राहकांना झटका; व्याजदरात केली वाढ

Interest on Bank Loan | देशातील सर्वोच्च बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 8 ऑगस्ट रोजी रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेतला. यादिवशी आरबीआय चलनविषयक धोरण समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानुसार, रेपो रेटमध्ये (RBI MPC Meeting ) कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. आरबीआयने रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा थेट परिणाम बँकांच्या व्याजदरांवर झाला (Interest on Bank Loan ) आहे.

काही बँकांनी व्याजदरात बदल करून त्यात वाढ केली आहे. यामध्ये कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि युको बँक यांचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. यामध्ये कॅनरा बँकेनं एमसीएलआर (MCLR) रेटमध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. सर्व मुदतीच्या कर्जासाठी ही वाढ करण्यात आली आहे.

‘या’ बँकांनी केली व्याजदरात वाढ

याचा परिणाम म्हणून आता बहुतांश ग्राहकांची कर्जे महाग होणार आहेत. कॅनरा बँकेने म्हटलंय की, एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR आता 9 टक्के असणार आहे. सध्या कॅनराचा MCLR हा 8.95 टक्के आहे. त्यामुळे आता 3 वर्षांचा MCLR 9.40 टक्के तर, दोन वर्षांसाठी MCLR हा 9.30 टक्के करण्यात आला आहे. एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी व्याज 8.35 ते 8.80 टक्के असेल. या 12 ऑगस्टपासून हे दर लागू केले जाणार आहेत.(Interest on Bank Loan )

बँक ऑफ बडोदाने देखील काही बदल केले आहेत. त्यांनी 12 ऑगस्टपासून हे बदल केले जाणार असल्याचं म्हटलं आहे. तर, युको बँकेची मालमत्ता दायित्व व्यवस्थापन समिती (ALCO) आजपासून म्हणजेच 10 ऑगस्टपासून काही कालावधीसाठी कर्जदरात 5 आधारभूत पॉइंट्स (bps) ने वाढ करणार आहे.

RBI चे नवीन पतधोरण काय?

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी RBI च्या नवीन पतधोरणाबाबत माहिती दिली. आरबीआयने SDF 6.25%, MSF 6.75% तसेच रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने सलग आठव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाहीये.(Interest on Bank Loan )

या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, ग्राहकांच्या गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच अन्य प्रकारच्या कर्जाच्या हप्यांत कोणतीही वाढ होणार नाही किंवा घटही होणार नाहीये. यावेळी आरबीआयने रेपो रेट जैसे थे (RBI MPC Meeting ) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

News Title :  Interest on Bank Loan

महत्त्वाच्या बातम्या-

राजकीय घडामोडींना वेग! बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला, महायुतीला देणार धक्का?

…म्हणून ‘या’ दिवशी अहमदनगरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!

सिनेविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

विनेश फोगाटला मेडल मिळणार?, अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?

पावसाची विश्रांती; ‘या’ तारखेनंतर पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार