Interim Budget 2025 l भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे बजेट (Budget) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील (Third Term) दुसरे बजेट असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही भारताचे अर्थमंत्री (Finance Minister) संसदेत (Parliament) अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात सरकार मुलांसाठी (Children) आणि महिलांसाठी (Women) काही विशेष घोषणा (Announcements) करू शकते.
जर आपण देशातील शेतकऱ्यांबद्दल (Farmers) बोललो तर, गेल्या अनेक वर्षांपासून सरकार देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न (Income) वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा आहे की या अर्थसंकल्पातही सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
शेतकऱ्यांसाठी संभाव्य मोठ्या घोषणा
किसान क्रेडिट कार्ड : २०२२५ च्या अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा (Limit) वाढवू शकते. सध्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपये आहे. या अर्थसंकल्पात सरकार ही रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना १९९८ मध्ये सुरू झाली होती. या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदराने (Low Interest Rate) कर्ज (Loan) देते.
जीएसटीतून (GST) शेतकऱ्यांना दिलासा: या अर्थसंकल्पात सरकार शेतीत (Agriculture) वापरल्या जाणाऱ्या बियाणे (Seeds) आणि कीटकनाशकांवरील (Pesticides) जीएसटीतून सवलत (Rebate) देऊ शकते. सरकार वेगवेगळ्या बियाण्यांवर वेगवेगळा जीएसटी लावते. या अर्थसंकल्पात सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जीएसटी कमी करू शकते अशी अपेक्षा आहे.
कृषी योजनांच्या (Agricultural Schemes) आर्थिक तरतुदीत (Financial Provision) वाढ: २०२५ च्या अर्थसंकल्पात, सरकार कृषी योजनांसाठीची तरतूद वाढवू शकते. गेल्या अर्थसंकल्पात सरकारने कृषी योजनांसाठी ६५,५२९ कोटी रुपयांची तरतूद केली होती.
१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे (Country) या अर्थसंकल्पाकडे लक्ष असणार आहे.
News Title : Interim Budget 2025: Possible announcements for farmers