औरंगाबाद | मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. त्यामुळे आंदोलना दरम्यान अफवा पसरू नयेत म्हणून औरंगाबादमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक होऊन आंदोलन केले. त्याचे सर्वाधिक परिणाम मराठवाड्यात दिसून येत असल्याने खबरदारी म्हणून मराठवाड्यातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. औरंगाबादमध्ये सरकारी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, उस्मानाबादमध्येही आंदोलकांनी धरणे आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे उस्मानाबादमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-खासदार संभाजीराजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा
-मराठा मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे- दीपक केसरकर
-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी
-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील
-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!