बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील काही भागातील इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत.

दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळापूर्वीच स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.

गृहमंत्रालयाच्या या आदेशानुसार सिंघु, टिकरी आणि मुकरबा, नांगलोई, नकुरबा चौक या तणावग्रस्त भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?- संजय राऊत

संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकला होता पोलीस कर्मचारी, मदतीसाठी एक शेतकरीच धावला!

रेणू शर्माने बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही- राहुल गांधी

धक्कादायक! आंदोलनकर्त्यांचा पोलिसांवर तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न, एक पोलीस जखमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More