Mahila Samman Saving Certificate scheme | केंद्र सरकार (Central Government) महिलांसाठी (Women) काही खास योजना (Schemes) राबवत आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून महिलांना भरघोस व्याज (Interest) मिळू शकते. जर तुम्ही विवाहित (Married) असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. (Mahila Samman Saving Certificate scheme)
आम्ही बोलत आहोत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate – MSSC) योजनेबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने २०२३ मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत केवळ महिलांची खाती (Accounts) उघडता येतात.
गुंतवणुकीची रक्कम आणि व्याजदर
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत तुम्ही कमीत कमी १००० रुपये आणि जास्तीत जास्त २ लाख रुपये जमा करू शकता. या योजनेवर ७.५ टक्के व्याजदर मिळतो.
ही योजना दोन वर्षांत परिपक्व (Mature) होते. मात्र, खाते उघडल्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर तुम्ही पात्र शिल्लक रकमेच्या (Eligible Balance) ४० टक्के रक्कम काढू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या पत्नीच्या (Wife) नावे कोणत्याही बँकेत (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडू शकता.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत तुम्ही २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकत नाही. जर तुम्ही २ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला या रकमेवर ७.५ टक्के व्याज मिळेल. त्यानुसार, मुदतपूर्तीनंतर (Maturity) तुमच्या पत्नीला एकूण २,३२,०४४.०० रुपये मिळतील. म्हणजेच, तुमच्या पत्नीला २ लाख रुपयांच्या ठेवीवर (Deposit) एकूण ३२,०४४ रुपये व्याज मिळेल. (Mahila Samman Saving Certificate scheme)
आई किंवा मुलीच्या नावेही उघडू शकता खाते
जर तुमचे अद्याप लग्न झाले नसेल, तर तुम्ही तुमच्या आईच्या (Mother) नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. तसेच, जर तुम्हाला मुलगी (Daughter) असेल तर तुम्ही तिच्या नावेही हे खाते उघडून गुंतवणूक करू शकता. (Mahila Samman Saving Certificate scheme)
Title : Invest in Mahila Samman Saving Certificate scheme and get guaranteed returns
महत्वाच्या बातम्या-
रिलायन्स जिओचं मोठं पाऊल, Airtel आणि Vi पुन्हा एकदा टाकलं मागे
मोठी बातमी समोर; अर्जुन कपूर, भूमी पेडणेकरच्या शूटिंग दरम्यान दुर्घटना
आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही!
वजन कमी करण्याचा सोपा मार्ग; ‘या’ 3 ट्रिक्स वापरून घटवा झटपट वजन
धनंजय मुंडेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, तटकरे तोंडावर पडले