SBI FD Scheme | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक (Largest Government Bank) आणि सर्वाधिक सुरक्षित बँक (Safest Bank) म्हणून ओळखली जाते. रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडेच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी (HDFC), आयसीआयसीआय (ICICI) या दोन बँकांचा आणि एसबीआय या सरकारी बँकेचा समावेश होता. (SBI FD Scheme)
या तीन बँका देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून ओळखल्या जातात. अशा परिस्थितीत या तिन्ही बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit – FD) करणाऱ्यांचे प्रमाण देखील फारच अधिक असल्याचे दिसते. दरम्यान जर तुम्ही आगामी काळात एसबीआयच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक (Investment) करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एसबीआयच्या 400 दिवसांच्या विशेष एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
एसबीआयकडून आपल्या ग्राहकांना अधिकचा परतावा (Return) मिळावा यासाठी काही विशेष FD योजना राबवल्या जात आहेत. बँकेकडून 444 दिवसांसाठी आणि 400 दिवसांसाठी विशेष FD योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण 400 दिवसांच्या एफडीची माहिती पाहणार आहोत. या एफडी योजनेसाठी काय व्याजदर (Interest Rate) लागू आहेत, यामध्ये पाच लाखाची गुंतवणूक केली तर ग्राहकांना किती रिटर्न मिळणार, याचीच माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत.
कशी आहे एसबीआयची 400 दिवसांची विशेष एफडी योजना?
एसबीआयच्या एफडीबाबत बोलायचे झाले तर बँकेकडून ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीची एफडी योजना सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे एसबीआय विशेष एफडी योजना देखील सुरू करते. एसबीआयकडून जी 444 दिवसांची विशेष एफडी योजना सुरू करण्यात आली आहे त्यावर बँकेकडून सर्वाधिक म्हणजेच 7.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
याशिवाय ही सरकारी बँक 400 दिवसांची विशेष एफडी योजना चालवत आहे, ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 7.10% दराने परतावा मिळतोय. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) ग्राहकांना 7.60% दराने व्याज मिळते. म्हणजेच 0.50% अतिरिक्त व्याज मिळते. (SBI FD Scheme)
400 दिवसांच्या एफडीमध्ये पाच लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?
एखाद्या सामान्य ग्राहकाने (General Customer) जर एसबीआयच्या 400 दिवसांच्या विशेष FD योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 7.10% दराने मॅच्युरिटीवर (Maturity) पाच लाख 40 हजार 89 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 40 हजार 89 रुपये रिटर्न मिळणार आहेत.
तसेच जर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांनी म्हणजेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी या एफडीमध्ये पाच लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर म्हणजेच 400 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाच लाख 43 हजार तीन रुपये मिळणार आहेत. यामध्ये 43 हजार 3 रुपये त्यांना व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत. (SBI FD Scheme)
थोडक्यात, एसबीआयची 400 दिवसांची विशेष एफडी योजना गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरत आहे.
Title : Invest In SBI FD Scheme Get Up To 43000 Return On 5 Lakh Investment