बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ योजनेतून मुलीच्या नावानं गुंतवणूक करा, मुदत संपताच मिळतील 65 लाख रूपये

नवी दिल्ली | संसाराचा गाडा हाकताना जबाबदारीचं ओझ माणसाला गुंतवून टाकतं. मुलं हे संसाराच्या वेलीवर सुंदर फुल उमलावं तसं उमलतात आणि आनंद घेऊन येतात. अपत्याच्या आगमनानं जबाबदारी सुद्धा तितकीच वाढते. मुलं लहान आहेत तोवर त्यांच्या नावे काही गुंतवणूक केली की नंतर आपल्याला त्रास होत नाही.

मुलगी शिकण्यासाठी आणि तिच्या भविष्यासाठी आपल्याला पैसा लागणार असतो. मुलगी लहान असतानाच तिच्या नावावर गुंतवणूक कराल तर गुंतवणूकदाराला 65 लाख रूपये मिळू शकतात. सुकन्या समृद्धी योजना या योजनेत मुलीच्या नावावर बचत करता येते. केंद्र सरकारने ही योजना चालू केली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत 7.6 टक्के व्याज दिला जातो.

सुकन्या समृद्धी योजनेत 250 रूपये भरून सुद्धा सुरूवात करू शकता. एका आर्थीक वर्षात अनेकवेळा मिळून किंवा एकदाच तुम्ही 1.5 लाख भराल तर त्या प्रमाणात रक्कम सुद्धा मोठी मिळेल. या योजनेला आयकर नियमात सुट देण्यात आली आहे. या योजनेत खातं उघडायचं असल्यास मुलगी 10 वर्षाची होण्याच्या आत खातं उघडावं लागतं. सुरूवातीची 15 वर्ष रक्कम जमा करावी लागते. नंतर मॅच्युरिटीपर्यंत व्याज मिळत राहील.

मुलगी 18 वर्षाची झाली की तिच्या उच्च शिक्षणासाठी तुमच्या एकूण रकमेतील 50 टक्के रक्कम काढता येते. मुलीच्या 21 वर्ष वयानंतर तुम्हाला सर्व रक्कम 7.6 टक्के व्याजानुसार मिळते. समजा एखाद्यानं दरवर्षी या खात्यात 1.5  लाख भरले तर त्याची 15 वर्षातील रक्कम 22.5 लाख होईल. या रकमेवर 7.6 टक्के व्याजानुसार 65 लाख मिळतील.

थोडक्यात बातम्या 

मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले माहित नाही, पण… – उदयनराजे भोसले

मोठी बातमी! एमपीएससी आयोगाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

शिवसेनेशी पंगा नंतर फोन, आता थेट भेट; अमित शहा आणि राणेंमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

‘या’ कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी; वैज्ञानिकांचा दावा

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More