बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा; याचिका दाखल

मुंबई | केंद्र सरकारने कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास राज्य सरकारकडून काढून घेत तो तपास एनआयएकडे वर्ग केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.

तत्कालिन मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण आणि पोलीस तपासात विसंगती असल्याचा आरोप लाखे पाटील यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे त्यांनी तशी इन्टरवेन्शन याचिका दाखल केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना ‘अर्बन नक्सल’ या शब्दाचा उल्लेख केला नव्हता आणि पाठीमागच्या काळापासून त्यांची विधाने विचारात घेतली असता ती विधाने परस्पर विरोधी आहेत. म्हणूनच आता त्यांची चौकशी व्हावी, त्यांचं स्टेटमेंट नोंदवलं जावं, अशी मागणी लाखे पाटील यांनी केली आहे.

बुधवारी जेव्हा सुनावणी होईल तेव्हा याबाबत अधिक माहिती समोर येईल. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली तरच देवेंद्र फडणवीसांची चौकशी होऊ शकते किंवा त्यांना आयोगापुढे यावं लागेल.

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला यात काही नवल नाही”

दात कोरून पोट भरण्याचे उद्योग; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील भाजपचे नेते करणार दिल्ली विधानसभेसाठी प्रचार

…तर सरकार बरखास्त होऊ शकतं- सुधीर मुनगंटीवार

…म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More