महाराष्ट्र मुंबई

राऊत कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा- किरीट सोमय्या

मुंबई | पीएमसी बँकेप्रकरणातील आर्थिक व्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता राऊत कुटुंबाच्याच चौकशीची मागणी केली आहे.

राऊत कुटुंबातील काही सदस्यांच्या एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

एचडीआयएलने पीएमसी बँकेचे 5400 कोटी रुपये ढापले आहेत. एचडीआयल आणि प्रवीण राऊत कुटुंबाचे कोट्यवधीचे आर्थिक संबंध आणि व्यवहार आहेत. तसेच प्रवीण राऊत आणि संजय राऊतांच्या कुटुंबाचेही आर्थिक संबंध आहेत. या दोन्ही राऊत कुटुंबांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा आला कुठून? या दोन्ही कुटुंबांच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी झाली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, वर्षा राऊत यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागवून घेतला आहे.


थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

“लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये जातात; आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार”

पुणेकरांनो काळजी घ्या; ब्रिटनहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता!\

“प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही”

वर्षा संजय राऊत यांचं ईडीला पत्र; केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या