मुंबई | भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं महाराष्ट्रासह संपूर्ण देश होरपळुन गेला आहे. यातच विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांना या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत भंडाऱ्याच्या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी ‘भंडाऱ्यात आगीत होरपळून नवजात बालकांचा झालेला मृत्यु ही अतिशय दु:खद व हृदय हेलावणारी घटना आहे. यातून ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेतील दोष आणि कमतरता पुढे आल्या आहेत. चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
तसेच इतर बालकांना वाचवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील, त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर राज्य सरकारनं संपूर्ण आरोग्य व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणीही प्रविण दरेकर यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व रुग्णालयाचं ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.
भंडाऱ्यात आगीत होरपळून नवजात बालकांचा झालेला मृत्यु ही अतिशय दु:खद व हृदय हेलावणारी घटना आहे. यातून ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेतील दोष आणि कमतरता पुढे आल्या आहेत. चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. @CMOMaharashtra@rajeshtope11 @AnilDeshmukhNCP @NANA_Patole pic.twitter.com/Erg5UBHrkC
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 9, 2021
थोडक्यात बातम्या-
10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला जाग; दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश!
पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालये सुरु करण्याच्या निर्णयामुळे गोंधळ; खुलासा करण्याचे आदेश
जाचक नियमांचा व्हॉट्सअपला फटका; जगभरात ‘या’ अॅची क्रेझ वाढली!
बहुचर्चित टाटा अल्ट्रोजमध्ये मोठा बदल; ‘या’ तारखेला उठणार पडदा!
10 चिमुकल्यांच्या मृत्यूबद्दल राहुल गांधींकडून दु:ख व्यक्त; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी