बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा- उच्च न्यायालय

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि आपल्या पतीच्या वतीने काही गुंड आपल्यावर सतत नजर ठेवून असतात व आपला मानसिक छळ करतात, अशी तक्रार एका 36 वर्षीय महिलेने केली. या तक्रारीनुसार चौकशी करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत.

मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या या महिलेने फेब्रुवारीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत व तिच्या पतीच्या वतीने काही गुंड तिच्यावर सतत नजर ठेवून आहेत व मानसिक छळ करत आहेत, असं याचिकेत म्हटलं आहे. याचिका दाखल केल्यावर तिला अदखलपात्र गुन्ह्यासाठी अटक झाली.

पीएच.डी.ची डिग्री बनावट असल्याचा पोलिसांचा दावा आहे, असं याचिकाकर्तीच्या वकील आभा सिंग यांनी सांगितलं. याचिकाकर्ती गेले 12 दिवस कारागृहात आहे. तिने याचिका दाखल केल्यावर पोलीस तिच्यामागे लागले, असं सिंग म्हणाल्या.

दरम्यान, याचिकाकर्तीच्या तक्रारीत पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे आणि योग्य ती पावले उचलावीत. तसेच 24 जूनपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना दिलेत.

थोडक्यात बातम्या- 

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल!

भारताला मिळणार चौथी लस; ‘या’ लसीला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता

मी हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणं ही दुर्देवाची बाब- जितेंद्र आव्हाड

…हा तर ओबीसींवर घोर अन्याय; आम्ही याविरूध्द न्यायालयात धाव घेणार- पंकजा मुंडे

ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी आम्ही…- देवेंद्र फडणवीस

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More