Santosh Deshmukh Case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यातच अचानक बदल केला आहे. या बदलामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता असून, राजकीय हस्तक्षेप (Political Interference) होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने आणि निषेध मोर्चे काढण्यात आले होते. या दबावानंतर, वाल्मीक कराडवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, आता सीआयडीमध्ये (CID) अचानक मोठा बदल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी बदलला
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर (Anil Gujar) करत होते. मात्र, आता त्यांच्या जागी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील (Kiran Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून तपासाधिकारी अचानक बदलण्यात आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (Santosh Deshmukh Case)
सुदर्शन घुले गँगचा लीडर, वाल्मिक कराड सदस्य
या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह नऊ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. सीआयडीने सुदर्शन घुलेला गँगचा लीडर (Gang Leader) दाखवले आहे, तर वाल्मीक कराडला गँगचा सदस्य (Gang Member) म्हटले आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध सीआयडी घेत आहे. त्यामुळे, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपासाधिकाऱ्यात अचानक बदल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा बदल म्हणजे तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Santosh Deshmukh Case)
या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्षपातीपणे (Impartial) तपास व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Title: Investigating Officer Changed in Sarpanch Santosh Deshmukh Case
महत्वाच्या बातम्या-
सैफ अली खानच्या आधी ‘या’ अभिनेत्यांच्या घरीही झालीये घुसखोरी, नावं ऐकून धक्का बसेल
सैफ अली खान हल्ला प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा समोर!
NEET UG ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी!
एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी गुडन्यूज, महामंडळानं केली सर्वात मोठी घोषणा
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गात मोठा बदल?, आढळराव पाटलांच्या आरोपांनी खळबळ