Devendra Fadnavis l बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे तणावाचे वातावरण आहे. अशातच आता अजून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावेळी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बीडमधील शेतीचा पिक विमा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा केंद्रस्थानी आला आहे.
बीडमधील मोठा घोटाळा उघड :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, यंदाच्या वर्षी पिकविम्याचे सर्वोत्तम काम बीड जिल्ह्याने केलं होतं. परंतु आता यासंदर्भात एक मोठा घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. कारण कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी पिक विमा उचलतंय अशी बाब समोर आली आहे. त्यामुळे आता या पिकविम्याची सखोल चौकशी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आहे.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. यासंदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी पिक विमा योजनेमध्ये होणारा मोठा घोटाळा उघड केला होता. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुद्याची दखल घेतली आहे.
Devendra Fadnavis l पिकविम्याची सखोल चौकशी करणार? :
“कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी पिक विमा उचलतं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते मग तुमच्याकडे गेले. परंतु, आता पुन्हा आमच्याकडे आले आहे. मात्र आता त्यांनी मांडलेल्या पिकविम्याची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत असं ते म्हणाले आहेत.
याशिवाय हा पैसा करदात्यांचा आहे. त्यामुळे धस साहेब हे प्रकरण आम्ही धसास नेल्याशिवाय राहणार नाहीत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं असल्याचं बोललं जात आहे.
News Title –investigation scam in crop insurance scheme in beed
महत्त्वाच्या बातम्या-
अजितदादा…धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका; कोणी केली मागणी?
सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर शरद पवार भावुक; म्हणाले…
“…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही”, सरपंच हत्याप्रकरणावरून शरद पवारांनी सरकारला दिला इशारा
‘नोकरी टिकवायची असेल तर मला…’; ऑफिसमधल्या महिलेसोबत नक्की काय घडलं?
संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शरद पवारांनी दिलं मोठं आश्वासन!