बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Share Market: लाखाचे केले 66 लाख!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

मुंबई | कोरोना (Corona) या महामारीचा सर्व क्षेत्रांवर परिणाम झाल्याचं आपण पाहीलं आहे. अशात शेअर मार्केट ( Share Market ) हे एकच क्षेत्र सध्या आश्वासक वाटचाल करताना दिसत आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूकीचा (Investment) मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना फायदा होत आहे. अशातच पेनी स्टाॅकच्या (Penny Stock) शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आहे.

शेअर बाजारात सध्या मोठी तेजी चालू आहे. अशात काही शेअर्सनं मोठा फायदा कमावला आहे. बाजारात कमी मुल्य असताना केलेली गुंतवणूक आता मोठ्या नफ्यात परावर्तीत झाली आहे. पेनी स्टाॅकचा (Penny Stock) तर सध्या सर्वत्र बोलबाला आहे. पेनी स्टाॅकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वाधिक फायदा सध्या होत आहे. अशातच सुरज इंडस्ट्रिज कंपनीचा शेअर मल्टीबॅगर (Multibagger) ठरला आहे. सुरज कंपनीच्या शेअरनं सध्या तब्बल 6 हजार 522 टक्के परतावा दिला आहे.

मागील वर्षात सुरज कंपनीचा शेअर फक्त एक रूपयाला मिळत होता. त्यात सध्या कित्येक पटींनी वाढ झाली आहे. 1 लाखाचे अवघ्या 15 महिन्यांमध्ये तब्बल 66 लाख रूपये झाले आहेत. परिणामी या शेअरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 19 ऑगस्ट 2020 ला सुरज कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 1.18 रूपये होती. ही किंमत आज 78.15 रूपये एवढी आहे. सुरज कंपनीनं गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला आहे.

दरम्यान, सुरज इंडस्ट्रिज कंपनीची निर्मिती 1992 मध्ये झाली होती. या कंपनीनं सध्या मोठी भरारी घेतली आहे. छोट्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“…तर राज्यात लाॅकडाऊन लावावं लागेल”

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राज्यात आढळला Omicronचा पहिला रूग्ण

“…मग हा हट्ट कशासाठी?”, नाराजी व्यक्त करत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

तेजस्विनी पंडीत म्हणते ‘लिपस्टिक बॅन’, चाहत्यांना पडला प्रश्न

“महाराजांच्या दरबारात शायरी व्हायची म्हणतात, ‘मुजरा’ व्हायचा म्हटले नाही हे नशीब”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More