Invetsment Plan LIC Yojana | प्रत्येक जण कमाईचा एक भाग हा बाजूला ठेवत असतो. भविष्यात अडी-अडचणीच्या काळात कुणापुढे हात पसरायला लागू नये, म्हणून प्रत्येक जण गुंतवणूक करत असतो. अशाच एलआयसीच्या अनेक योजना आहेत, ज्या गुंतवणूकदारांना खूप फायद्याच्या ठरतात. यातून (Invetsment Plan LIC Yojana) तुम्ही मोठा नफा कमावू शकता.
बरेच लोक भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये मोठा फंड तयार करण्यासाठी गुंतवणूक करतात. मात्र, काही लोक एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्यापासून संकोच करतात किंवा करतच नाहीत. कारण, त्यांना वाटते की त्यांचा प्रीमियम खूप जास्त आहे.
अशात तुम्ही जीवन आनंद पॉलिसी नावाची LIC ची पॉलिसी नक्कीच निवडू शकता. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दररोज फक्त 45 रुपये गुंतवून 25 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता. याचे इतर फायदे देखील मिळतात.
ही एक प्रकारे टर्म पॉलिसी आहे. या (Invetsment Plan LIC Yojana) पॉलिसीमध्ये चार प्रकारचे रायडर्स उपलब्ध आहेत. यामध्ये अपघाती मृत्यू, अपंगत्व, अपघात लाभ, नवीन टर्म इन्शुरन्स लाभ यांचा समावेश आहे. विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पॉलिसीच्या मृत्यू लाभाच्या 125 टक्के रक्कम मिळते.
45 रुपयांची गुंतवणूक करुन 25 लाखांचा निधी कसा मिळणार?
समजा तुमचे वय जर 30 वर्षे आहे. तर,तुम्हाला ही पॉलिसी 5 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत तुम्हाला 1341 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल. हा प्रीमियम दररोज सुमारे 45 रुपये असेल. तुम्हाला यामध्ये 35 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. 35 वर्षांनंतर तुम्हाला 25 (Invetsment Plan LIC Yojana) लाख रुपये मिळतील.
गुंतवणूकदाराला या 25 लाखांपैकी 5 लाख रुपये विमा , 8.50 लाख रुपये आणि 11.50 लाख रुपये अंतिम अतिरिक्त बोनस म्हणून दिले जातील. अशा प्रकारे तुम्हाला 25 लाखांचा निधी मिळेल.
जीवन आनंद पॉलिसीचे इतर फायदे-
यामध्ये पॉलिसीधारकाला किमान 6.25 लाख रुपयांचे जोखीम कव्हर मिळेल. यामध्ये 30 लाख रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे ते 35 वर्षे आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार मॅच्युरिटी निवडू शकता.
पॉलिसीमध्ये दोन वेळा बोनस दिला जातो, परंतु यासाठी तुमची पॉलिसी 15 वर्षांची असणे आवश्यक आहे.
यामध्ये किमान विमा (Invetsment Plan LIC Yojana) रक्कम 1 लाख रुपये आहे. कमाल मर्यादा नाही.
पॉलिसीमध्ये गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा कोणताही फायदा नाही.
News Title- Invetsment Plan LIC Yojana
महत्वाच्या बातम्या-
लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा त्रस्त?, धक्कादायक सत्य आलं समोर
राज्य सरकारचा करंटेपणा, ॲालिम्पिकला जाण्यापूर्वी स्वप्निलला 50 लाखांची घोषणा करुन रुपयाही दिला नाही!
अटकेच्या भीतीने पूजा खेडकर परदेशी फरार?, मोठी अपडेट समोर
ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा महागलं, 10 ग्रॅमसाठी आता..
राहुल गांधींचा ट्वीट करत गंभीर दावा; देशभर एकच खळबळ